हॉरर चित्रपट पाहताना मी आवाज बंद करुनच बघते.. काजोलचा खुलासा

हॉरर चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग हा दिवसागणिक वाढत आहे. आता पुन्हा एकदा ‘मा’ या चित्रपटाच्या माध्यमातून भयपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी मेजवानी मिळणार आहे. सध्या काजोल तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘मा’ या चित्रपटासाठी सध्या माध्यमांशी ती संवाद साधत आहे. हा चित्रपट हॉरर चित्रपट असून, ती मात्र हॉरर चित्रपटांची फॅन नाही असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. असे असले तरी काजोलच्या कुटुंबाला मात्र हॉरर चित्रपट आवडतात. म्हणूनच काजोल हॉरर चित्रपट बघताना आवाज म्यूट करुनच बघते.

काजोलने या हॉररपटात काम केले असले तरी, वैयक्तिकरीत्या ती मात्र हे चित्रपट पाहण्यास घाबरते. म्हणूनच काजोल भूताचे चित्रपट पाहताना कायमच त्याचा आवाज बंद करुनच पाहते. भूताचे चित्रपट पाहताना त्याच्या आवाजामुळे अधिक भीती वाटते म्हणून, काजोल कायमच भूतपट पाहताना आवाज बंद करुनच बघते.

‘मा’ हा एक हॉररपट असून, याच्या ट्रेलरने अनेकांना धडकी भरवली होती. माचे ट्रेलर रिलीज होताक्षणी या ट्रेलरला हॉरर चित्रपट आवडणाऱ्यांनी पसंती दर्शवली होती. काजोलच्या या चित्रपटाने काजोल एका आईच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही आई आपल्या मुलीच्या रक्षणासाठी कोणते पाऊल उचलते हे या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

काजोलचा मा हा चित्रपट 27 जूनला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केला आहे. हिंदी व्यतिरिक्त, हा चित्रपट तमिळ, तेलगू आणि बंगाली भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी काजोल ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘दो पत्ती’ या चित्रपटात पोलिस कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसली होती. सलाम वेंकी या चित्रपटातही तिने आईची भूमिका साकारली होती.