
आपल्या विद्रोही लेखणीने ज्यांनी अनेकांचे धाबे दणाणून सोडले, वेळप्रसंगी व्यवस्थेलाच धारेवर धरले अशा महाकवी नामदेव ढसाळ यांचा सेन्सॉर बोर्डाला आणि व्यवस्थेला पडलेला विसर ही अस्वस्थ करणारी बाब आहे. इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या जखमा ज्यांच्या कवितेतून जगापुढे आल्या अशा महाकवीची नव्याने ओळख पटवून देण्यासाठी ‘कोण नामदेव ढसाळ?’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात मान्यवर साहित्यिक, कलाकार सहभागी होणार असून कवी ढसाळ यांच्या कविता सादर केल्या जाणार आहेत.
अभिनेत्री चिन्मयी सुमित, दिग्दर्शक हेमंत ढोमे, शाहीर संभाजी भगत, कवयित्री नीरजा, डॉ. प्रज्ञा दया पवार, अभिनेता पैलास वाघमारे, दीपक राजाध्यक्ष, नेहा पुलकर्णी आणि युवराज मोहिते ही मंडळी एकत्र येऊन कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांतील विद्रोहाचा जागर करणार आहेत. या कार्यक्रमात मान्यवरांकडून कवी नामदेव ढसाळ यांच्या कविता सादर केल्या जाणार आहेत. तसेच काही दुर्मिळ चित्रफिती आणि आठवणी यांच्याद्वारे नामदेव ढसाळ यांच्या विचारांना उजाळा देण्यात येणार आहे. गायक नंदेश उमप यांच्या दमदार सादरीकरणाने सांगता होईल. युवराज मोहिते यांच्या संकल्पनेतून तयार झालेला हा कार्यक्रम प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी गौरवलेला आहे. तसेच कलाविश्वातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रयोगशाळा या संस्थेकडून हा कार्यक्रम केला जाणार आहे.
रविवार 22 जूनला दुपारी 4 वाजता प्रभादेवी येथील मिनी थिएटरमध्ये हा सशुल्क कार्यक्रम होणार आहे. प्रवेशिकांसाठी संपर्प – 9773909097/9004493061.