
इस्रायल- इराण युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. यात फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या आण्विक तळांचा समावेश आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये हे तळ पूर्णपणे नष्ट झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा हल्ला यशस्वी झाला असून सर्व विमानं सुरक्षित परत आल्याचे त्यांनी म्हटले. या हल्ल्यात इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. आता शांततेची वेळ आहे. इराणने तातडीने हे युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणवरील हवाई हल्ल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे उद्दिष्ट इराणची अणुसंवर्धन क्षमता नष्ट करणे आणि त्याचा अण्वस्त्र निर्मितीचा धोका कायमचा नष्ट करणे आहे. गेल्या 40 वर्षांपासून इराण अमेरिकेविरुद्ध काम करत आहे आणि अनेक अमेरिकन या द्वेषाचे बळी ठरले आहेत, म्हणून मी ठरवले आहे की हे सर्व आता सुरू राहणार नाही. त्यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी इराणवर हल्ल्याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांनी पुढे ढकलला होता. ते सुटीवर असतानाही दोन्ही देशातील युद्धाची तीव्रता लक्षात घेता, ते वॉशिंग्टनला परतले आणि इराणच्या तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत चर्चा करत त्यांनी हल्ल्याचा निर्णय घेतल्याची माहितीही ट्रम्प यांनी दिली आहे. या हल्ल्यासाठी अमेरिकेने B 2 स्थील्थ बॉम्बरचा वापर केला. या हल्ल्यानंतर त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेत्यानाहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
इराण हा आखाती देशातील सर्वात मोठा दहशतवाद्यांचा समर्थक आहे. त्याचा बिमोड करणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही इराणच्या तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला केला आहे. आता इराणने युद्ध थांबवले नाही तर, गेल्या आठ दिवसात त्यांचे जे नुकसान झाले आहे. त्यापेक्षा भयंकर परिणाम त्यांना भोगावे लागतील. ही शांततेची वेळ आहे. इराणने युद्ध थांबवावे, अन्यथा विनाश अटळ आहे, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
#WATCH | “I want to congratulate the great American patriots who flew those magnificent machines tonight… Hopefully, we will no longer need their services and this capacity. I hope that so”, says US President Trump after the US strikes Iran’s three nuclear facilities amid the… pic.twitter.com/FVTycpLhgO
— ANI (@ANI) June 22, 2025
या मोठ्या कारवाईनंतर आता आम्हाला आखाती देशात शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी इराणने सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यांनी सहकार्य केले नाही तर यापेक्षा जास्त तीव्रतेने आम्ही त्यांच्यावर हल्ला चढवू. आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट नाही. असे हल्ले आम्ही वेगाने आणि तीव्रतेने करू शकतो, याचा अंदाज जगाला या कारवाईतून आलेला आहे, असेही ट्रम्प म्हणाले. इराणने इस्रायल आणि आखाती देशातील अनेकांचा नाहक बळी घेतला आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळणे गरजेचे होते. आम्ही जे केले ते जगातील कोणत्याही सैन्याला करणे शक्य नाही. इराण सातत्याने इस्रायल आणि अमेरिकेला धमक्या देत आहे. मात्र, आम्ही अशा धमक्यांना जुमानत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
US airstrikes on Iran – इस्रायल-इराण युद्धामध्ये अमेरिकेची उडी, इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला
यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकन सैनिकांचेही अभिनंदन केले. ‘अमेरिकेच्या महान योद्ध्यांचे अभिनंदन. जगातील इतर कोणतेही सैन्य अशी कारवाई करू शकत नाही. आता शांतता प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. या मुद्द्यांकडे लक्ष दिलेत त्याबद्दल आपले आभार’, असेही त्यांनी म्हटले.
सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू! इराणची अमेरिकेला धमकी, सरकारी वाहिनीवरून मोठी घोषणा