अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणासाठी देशातील सीएंची राष्ट्रव्यापी परिषद

देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित उपक्रमांच्या सबलीकरणासाठी चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) यांची दोन दिवसीय राष्ट्रव्यापी परिषद 26-27 जून रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे आयोजित करण्यात आली आहे. चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटतर्फे (आयसीएआय) मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित या परिषदेत देशभरातील आघाडीचे हजारो सीए सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे देशातील उद्योजक, वित्तीय संस्था, नियामक, धोरण-निर्माताही उपस्थित राहणार आहेत.