
पावसाळ्यात आपल्याला सूप पिण्याची वारंवार इच्छा होते. परंतु प्रत्येक वेळी आपण हाॅटेलमध्ये जाऊन सूप पिऊ शकत नाही. त्यापेक्षा मस्त पावसाचा आनंद घेत आपण घरच्या घरी केलेले सूप घेतले तर आपले पैसे तर वाचलीच. शिवाय हाॅटेलमध्ये जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल. पावसाळ्यात अगदी घरबसल्या साधे सोपे सूप तयार होईल ते म्हणजे चिली गार्लिक सूप.
चिली गार्लिक सूप
साहित्य
8-10 लसूण पाकळ्या
2 मिरच्या
1 कांदा
1 उकडलेला बटाटा
1 चमचा जिरे
1 चमचा कॅरम बियाणे
1 चमचा चिली फ्लेक्स
1 कप फ्रेश क्रीम
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी

कृती
सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात तेल घालून त्यात जिरे, लसूण चांगले तडतडू द्या. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा घाला.
आता त्यात उकडलेले चिरलेले बटाटे घाला आणि काही वेळ शिजवा. त्यानंतर पाणी घाला आणि शिजू द्या. (तुम्ही यामध्ये हवा असल्यास बारीक चिरलेला कोबी, गाजर, फरसबी घालू शकता. यामुळे या सूपची चव अधिक द्विगुणित होईल.)
आता हे मिश्रण थंड होऊ द्या. यानंतर, ते मिक्सरमध्ये टाकून बारीक करुन घ्या. त्यानंतर या मिश्रणात वरुन मस्त ताजी क्रीम घालावी. क्रीम घातल्यानंतर मिक्स करुन घ्यावे.
आता ते परत भांड्यात ठेवा आणि मिरचीचे तुकडे घाला आणि चांगले मिसळा. काही वेळाने, गॅस बंद करा आणि गरम सर्व्ह करा.
घरी अचानक आलेल्या पाहुण्यांना देखील हे झटपट होणारे सूप प्यायला तुम्ही देऊ शकता.
































































