
संसदीय अंदाज समित्या या ‘मिनी पार्लमेंट’ म्हणून काम करतात. संसदीय समितीच्या माध्यमातून सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणता येते. सरकारच्या कारभारात वित्तीय पारदर्शकता आणि सरकारी पैशाची उधळपट्टी रोखण्याचे काम आणि प्रत्येक पैशाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करा. अंदाज समित्यांच्या कारभारात आर्थिक पारदर्शकता गरजेची आहे, अशा स्पष्ट शब्दांत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकप्रतिनिधींचे कान टोचले.
z समारोपाच्या भाषणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंदाज समित्यांनी अत्यंत पारदर्शकतेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सरकारच्या एक एक पैशाचा आणि प्रत्येक रुपयाचा जनतेच्या कल्याणासाठी नियोजित पद्धतीने उपयोग करण्यासाठी समिती चांगल्या प्रकारे काम करील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात
धुळ्यातील अंदाज समितीच्या आधी धुळ्याच्या रेस्ट हाऊसमध्ये कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, पण आताची अंदाज समिती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे याकडे अंबादास दानवे यांनी लक्ष वेधले.