जोफ्रा आर्चरचे चार वर्षांनंतर पुनरागमन

हिंदुस्थानला पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या दुबळय़ा गोलंदाजीचा फायदा उठविता आला नाही. मात्र, आता इंग्लंडने दुसऱया कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाचे तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. ऍण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीत इंग्लंड-हिंदुस्थान दरम्यान बार्ंमगहॅममध्ये 2 जुलैपासून दुसरी कसोटी रंगणार आहे. जोफ्रा आर्चर अनेक वर्षांपासून हाताच्या ढोपराच्या दुखापतीने त्रस्त होता. त्याने चार वर्षांपूर्वी (2021) अहमदाबादमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

इंग्लंडचा संघ ः बेन स्टोक्स (कर्णधार), ओली पोप, हॅरी ब्रुक, जो रूट, बेन डकेट, जैक क्रॉली, जेमी स्मिथ, सॅम कुक, जेकब बेथेल, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, ब्राइडन कार्स, जेमी ओवरटन, जोश टंग, क्रिस वोक्स.