विक्रोळीतील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी शिवसेना उतरली रस्त्यावर

विक्रोळीतील वाहतूककोंडीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाहतूक-पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विक्रोळी पुलाजवळील वाहतूककोंडीची पाहणी करून त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.

विक्रोळीतील पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन पुलाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या पुलाच्या उद्घाटनानंतर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होऊ लागली आहे. पूर्वेला टागोर नगरला वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील राऊत यांनी जॉईंट सीपी कुंभारे, डीसीपी प्रदीप चव्हाण आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासमवेत पुलाजवळच्या परिसराची पाहणी केली. यावेळी शेखर जाधव, अभय राणे, राजोल पाटील, बेंद्रे, शंकर ढमाले, हेमंत पाबरकर, परम यादव उपस्थित होते.