हिंदी भाषा सक्ती आणि शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा पेटणार, 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार 30 जूनपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती आणि शेतकऱयांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा मुद्दा चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. या दोन मुद्दय़ांवरून विरोधक महायुती सरकारला प्रामुख्याने घेरण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीत पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार 30 जून ते 18 जुलै या काळात सभागृहाचे कामकाज चालणार आहे.