डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी आता फक्त 2 रुपये खर्च करा, वाचा

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नानाविध गोष्टी करतो. परंतु आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गुणकारी गोष्टींकडे मात्र खूपदा दुर्लक्ष करतो. नानाविध रसायनांची प्रोडक्टस् वापरुन चेहरा खराब झाल्यानंतर आपण घरगुती उपायांकडे वळतो. सध्याच्या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे ही सौंदर्यास बाधा आणतात. काळी वर्तुळे अधिक गडद झाल्यास, चेहरा कोमेजलेला दिसतो. त्यामुळेच या काळ्या वर्तुळांवर अगदी कमी खर्चाचा उपाय आपल्याच आजूबाजूला उपलब्ध आहे. ते म्हणजे एक केळे. एका केळ्यामुळेच आपल्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर उपाय करता येणार आहे.

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण अनेकदा महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करतो. परंतु आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या खूप अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपलं सौंदर्य अधिक खुलण्यास मदत होते. असेच एक फळ म्हणजे केळी. केळीची साल आपल्या त्वचेसाठी फार महत्त्वाचे कार्य करते. आपण केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देतो. परंतु ही साल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. केळीच्या सालीतील त्यात असलेले विशेष जीवनसत्त्वे आणि पोषक तत्व चेहऱ्यावरील चमक वाढविण्यास मदत करतात.

केळीची साल चेहऱ्याला लावण्याचे फायदे

केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6 आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक तुमच्या त्वचेला पोषण देतात.

 

केळीच्या सालीमुळे आपला चेहरा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. तसेच केळीच्या सालीतील व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देते.

आयुर्वेदानुसार केळी खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत

केळीच्या सालीमध्ये असलेले व्हिटॅमिन बी- 6 त्वचेला निरोगी आणि ताजेतवाने ठेवते. त्यामुळेच आपल्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या टाळण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावर केळीची साल कशी लावावी?

एक पिकलेले केळं घेऊन ते सोलून घ्या. सालीचा आतला पांढरा भाग तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हलके घासून 5-7 मिनिटे ठेवा. नंतर ते 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्यावरील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय मानला जातो.

केळीच्या सालीचे फायदे

– चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते, यामुळे त्वचेला तजेला येतो.
– त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि ती मऊ आणि हायड्रेटेड बनवते.
– काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.
– मुरुम आणि त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते.
– अकाली सुरकुत्या रोखते, यामुळे त्वचा तरुण दिसू लागते.