कवीने ‘मी’ आणि ‘मीपणा’ यामध्ये कधीही अडकू नये, अजय कांडर यांचे प्रतिपादन

कविता हा साहित्यप्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. कविता मोठय़ा प्रमाणात लिहिली जाते आणि सादर केली जाते. ठिकठिकाणी सातत्याने कविसंमेलने होत असतात. मात्र कवीने कवितेमधून आपला अनुभव किंवा वेदना मांडताना ‘मी’ आणि ‘मीपणा’ यामध्ये अडकू नये, असे प्रतिपादन ‘आवानओल प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कवी अजय कांडर यांनी येथे व्यक्त केले. ओरोस येथील ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठातर्फे कवी कालिदास दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘आषाढसरी’ कविसंमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

‘आम्ही साहित्यप्रेमी’चे समन्वयक सतीश लळीत, डॉ. सई लळीत, शंकर कोकितकर, मधुकर मातोंडकर, संतोष कदम, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आषाढ महिन्याच्‍या पहिल्या दिवशी आयोजित केलेल्या या ‘आषाढसरी’ कविसंमेलनात तब्बल 25 कवींनी सहभाग नोंदवला आणि रसिकांच्या मोठय़ा उपस्थितीत सभागृहात कवितांच्या सरी बरसल्या. संध्या तांबे, सई लळीत, शंकर कोकितकर, मधुकर मातोंडकर, पुरुषोत्तम
लाडू कदम, संतोष कदम, सुरेश पवार, सीमा मसुरेकर यांनी कविता सादर केल्या.