
ठाण्यातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर वसंतराव मोडक यांच शनिवारी पहाटे निधन झाले, ते 91 वर्षांचे होते. आपल्या सुमारे 65 वर्षांच्या छायाचित्रणाच्या कारकीर्दीत वसंतरावांनी ठाण्याचा इतिहासच चित्रित केला.
1990च्या सुमारास व्हिडिओ टेक्नॉलॉजी अगदी प्राथमिक अवस्थेत होती. त्यावेळी त्यांनी फोटोग्राफीतून व्हिडिओ क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढे ते सदैव आपली माहिती अपडेट करत या क्षेत्रात कार्यरत राहिले. नवीन तंत्रज्ञान जाणून घ्यायचा त्यांचा उत्साह याही वयात कायम होता. त्यांनी घडवलेल्या काही विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात मोठा नावलौक मिळवला आहे. त्यांच्या मागे पत्नी, आणि याच क्षेत्रात असलेले कन्या, जावई आहेत.