
29 ऑगस्ट रोजी मुंबईत आरक्षण मोर्चा काढणार असून, आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार आहोत. आम्ही 2 वर्षे सरकारला वेळ दिला. अजून किती वेळ द्यायचा, असा सवाल उपस्थित करून मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी आरक्षण आंदोलनावर चर्चा करण्यासाठी उद्या आंतरवालीत शेवटची बैठक होत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आतापर्यंत काय मिळालं? काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने आपली कामे सोडून बैठकीला या, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणे हा बैठकीचा अजेंडा असून, आता विजय मिळवायचाच असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.


























































