
‘नारायण राणे राजकारणात एवढ्या उंचीवर असेच गेले नाहीत. त्यांनी अंगावर केसी घेतल्या. भानगडी केल्या, मारामाऱ्या केल्या, मर्डर केले, त्यामुळे ते मोठे झाले,’ अशा शब्दांत मिंधे गटाचे भरत गोगावले यांनी आज भाजपचे खासदार नारायण राणे यांची कुंडलीच मांडली. मिंधे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कोकणात आम्हीच नंबर एकला आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपलाही डिवचले.