
निवडणूक मग ती विधानसभा, लोकसभा, महापालिकेची असो की कृषी उत्पन्न बाजार समितीची. या निवडणुकांसाठी 24तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि ते आपल्या व्हॅनकडे निघाले. पण ही व्हॅन सुरूच होईना.. चालकाने अनेक प्रयत्न केले. अखेर ड्युटी करून थकलेल्या पोलिसांना पोलिसांच्याच गाडीला दे धक्का द्यावा लागला, त्यानंतर गाडी सुरू झाली. या व्हॅनला गळती लागली असून पावसाचे पाणी आत पडते. त्यावर नामी उपाय म्हणून चक्क ताडपत्री लावण्यात आली आहे. राज्याच्या गृहखात्याचा हा ‘कडक’ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.