असं झालं तर… एटीएम पिन नंबर विसरलात तर…

1. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याकडे जे डेबिट कार्ड आहे. त्याला एक चार अंकी पिन नंबर असतो. पिन नंबर टाकल्याशिवाय पैसे काढता येत नाहीत.

2. एटीएम पिन नंबर लक्षात नसेल किंवा विसरला गेला असाल तर सर्वात आधी ज्या बँकेत तुमचे बँक खाते आहे, त्या बँकेच्या शाखेत जा. बँक कर्मचाऱयांची मदत घ्या.

3. बँकेत एक फॉर्म भरून द्या. त्यासाठी सर्वात आधी आपले ओळखपत्र बँक कर्मचाऱयांना दाखवा. बँकेकडून तुम्हाला नवीन एटीएम पिन नंबर दिला जाईल. तो नीट लक्षात ठेवा.

4. नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अॅपने एटीएम पिन रिसेट करा. एक नवीन पिन बनवा. एसएमएसच्या माध्यमातूनही नवीन एटीएम पिन बनवता येतो.

5. एटीएम पिन नेहमी सुरक्षित ठेवा. हा पिन कोणाला सांगू नका. गरज पडल्यास एका गुप्त ठिकाणी लिहून ठेवा. ज्या वेळी पिन नंबर विसराल, त्या वेळी त्याची मदत मिळेल.