कोलकाता हायकोर्टाकडून क्रिकेटपटू मोहम्मद शमीला झटका, पत्नीला चार लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश

मोहम्मद शमीला घटस्फोट प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयातून मोठा झटका बसला आहे. पत्नी हसीन जहाँला महिना चार लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. यापैकी दीड लाख रुपये हसीन जहाँला तर अडीच लाख रुपये मुलगी आयराला दिले जाणार आहेत. तसेच गेल्या सात वर्षांपासून ही रक्कम देण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. तसेच खालच्या न्यायालयाला सहा महिन्यांच्या आत हा खटला निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मोहम्मद शमी आणि त्याची मुलगी आयराची भेट झाली होती. दोघांनी एकत्र शॉपिंग केली आणि यावेळी शमी खूप खुश दिसत होता. शमीने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. तसेच एक भावनिक कॅप्शनही लिहिली होती.

पण ही भेट म्हणजे फक्त एक जाहिरात होती असा दावा हसीन जहाँने केलेा होता. माझ्या मुलीचा पासपोर्ट एक्सपायर झाला आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीच्या सहीची गरज आहे. म्हणूनच ती त्याला भेटायला गेली होती. पण शमीने सही केली नाही. तो तिला शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेला. ज्या कंपनीसाठी शमी जाहिरात करतो, तिथेच तिला नेलं. तिने तिथून बूट आणि कपडे घेतले. या शॉपिंगसाठी शमीला एक रुपयाही खर्च करावा लागला नसल्याचे हसीनने सांगितले.