
1 प्रवासात चढताना आणि उतरताना नेहमीच घाई असते. मग तो प्रवास रेल्वेचा असो, विमानाचा असो की सरकारी बसचा. प्रवासात बऱ्याचदा नकळत सामान विसरले जाते.
2 जर तुम्ही प्रवासामध्ये सामान विसरले असाल तर जास्त गोंधळून जाऊ नका. चिडचिड करू नका. शांत रहा आणि कोणकोणते सामान विसरले हे आठवा.
3 जर तुमची वस्तू रेल्वेत, टॅक्सीमध्ये किंवा बसमध्ये राहिली असेल तर संबंधितांशी तत्काळ संपर्प करा. काय काय विसरले आहे, हे त्यांना शांतपणे व्यवस्थित समजून सांगा.
4 तुमचे सामान किती मौल्यवान आहे. त्यात सोने-चांदीचे दागिने असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सामान हरवल्याची तक्रार करा. याची तुम्हाला मदत होईल.
5 पुढच्या प्रवासावेळी पॅकेजिंग चेकलिस्ट तयार करा. ती तुमच्या सोबत किंवा सोबतच्या व्यक्तीकडे ठेवा. पुढच्या प्रवासात सामान विसरणार नाही याची काळजी घ्या. उतरण्याची घाई करू नका.