
पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर आता इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. इंडियन बँकेत आता मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही. बँक खात्यात जर पुरेसे पैसे नसतील तरीसुद्धा ग्राहकांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. 7 जुलै 2025 पासून इंडियन बँकेच्या ग्राहकांसाठी हा नियम लागू केला जाणार आहे.