ट्रेंड – खेळ मांडला…

जत्रा किंवा उत्सवाच्या ठिकाणी रस्त्यावर खेळ दाखवणारे लोक आपण बघतो. रस्त्यावर मुलाबाळांना घेऊन खेळ दाखवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला रस्त्यावर खेळ दाखवताना दिसत आहे. तो विठ्ठलासारखा दोन्ही हात कंबरेवर ठेवून उभा आहे. त्याने कपाळावर टिळा लावला आहे आणि त्याच्या टोपीवर दोरी बांधली आहे आणि या दोरीच्या दुसऱ्या टोकाला जड वस्तू बांधली. तो मान हलवत असल्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसत नाही. चिमुकला मान हलवून ती दोरी गोल गोल फिरवताना दिसत आहे आणि दोरीसह ती जड वस्तूसुद्धा गोल गोल फिरत आहे. हा खेळ पाहायला अनेक लोक जमलेले आहेत. काही लोक त्याच्या समोर ठेवलेल्या ताटात पैसे टाकत आहेत. तो दाखवत असलेल्या खेळाला पाहून लोक ताटात पैसे टाकत आहेत. हा पुण्यातील वारीदरम्यानचा व्हिडीओ आहे.