
हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यामुळे शिवसेना-मनसेच्या मोर्चाऐवजी शनिवारी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शिवसैनिक आणि मनसैनिकांनी तुफान गर्दी केली होती.



























































