Dharashiv News – माय मराठीच्या विजयाचा उत्सव कळंबमध्ये शिवसैनिक-मनसैनिकांनी पेढे भरवत मोठ्या उत्साहात साजरा केला

मराठी तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा आवाज आसमंतात घुमण्यासाठी हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी शक्तीच्या विजयाचा अभुतपूर्व उत्सव शिवसैनिक मनसैनिकांनी कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात वाजत गाजत गुलालांची उधळण करत साजरा केला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायासाठी लढा दिला व मराठी माणसाचा आवाज मुंबई बरोबर राज्यात बुलंद ठेवला. मराठी माणसाची एकजुट करून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधुनी एकत्रीत येत, हा मराठी जणांचा उत्सव साजरा करण्याची हाक दिल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख सचीन काळे यांच्या नेतृत्वाखाली कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजता शिवसेना, मनसैनिक व मराठी प्रेमींनी एकत्रीत येत हा मराठीचा विजयोत्सव साजरा केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, उपजिल्हाप्रमुख प्रदिप मेटे, निवडणूक प्रमुख संजय मुंदडा, मनसे ताप्रमुख गोपाळ घोगरे, सागर बाराते, दिलीप पाटील, शहरप्रमुख विश्वजित जाधव, शाम खबाले, सागर मुढे, पंडीत देशमुख, सुधिर भवर, मंदार मुळीक, शकिल काझी, संतोष लांडगे, गोविंद चौधरी, डॅा जोगदंड, समाधान बाराते, शशिकांत पाटील, शुभम करंजकर, बाळासाहेब कोल्हे, आश्रुबा बिक्कड, अक्षय बाराते, निखिल कापसे, राकेश जगताप, पुरुषोत्तम चाळक, बाळासाहेब गंभिरे, संजय भोसले, बिबिशन देशमुख, बिबिशन गायकवाड, कल्याण गुरसाळे, सुलेमान मिर्झा, निर्भय घुले, सागर शिगणापुरे, हर्षवर्धन पाटील, बंडू यादव, अफसर पठाण, संतोष पवार, अनंत अंबिरकर, सुरज सातव, महादेव अंबिरकर, मनोज चोंदेभरत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.