Skin Care – एक चमचा मध आपल्या सौंदर्यासाठी आहे वरदान, वाचा

घरच्या घरी करण्यात येणारे काही उपाय हे आपल्या खिशासाठी फायदेशीर असतात. शिवाय हे उपाय तितकेच परिणामकारकही असतात. चेहऱ्यावर तजेला आणण्यासाठी मध हे खूप महत्त्वाचे मानले जाते. मधाचा आपल्या सौंदर्यासाठी हा खूप उपयोग होतो. म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी मधाचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मध हे आपल्या त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. मधामुळे आपल्या त्वचेवर येणाऱ्या मुरुमांना रोखण्यास मदत होते. त्याचबरोबर मध हे त्वचेसाठी औषधापेक्षा कमी नाही.

Skin Care – चेहरा सुंदर दिसण्यासाठी कच्चे दूध वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

मधामुळे त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते. मुरुम आणि त्वचेची जळजळ प्रतिबंधित करते, मुख्य म्हणजे मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत. आपण मधाच्या वापराने घरच्या घरी सुद्धा अनेक गोष्टी करु शकतो.

मधाचे फेशियल करताना सर्वात आधी चेहरा आणि मानेवर मध लावावे. किमान 20 मिनिटे मध लावून तसाच चेहरा सुकवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावा.
मधाच्या फेशियलमुळे आपल्या त्वचेची उघडी छिद्रे बंद होतात, त्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे मधापासून एक चांगला टोनर तयार होतो. हा टोनर आपल्या त्वचेसाठी उपयुक्त पौष्टिक घटक देण्यास मदत करतो.

मुरुमांमुळे होणारे डाग कमी करण्यास मधाचा वापर हा केला जातो. तसेच मृत त्वचा काढून टाकण्यासही मध खूप उपयुक्त मानला जातो. मधाच्या नियमित वापराने आपला चेहरा चमकदार बनतो. तसेच त्वचेची जळजळ कमी होण्यासही मध हे खूप उपयुक्त मानले जाते.

मधापासून टोनरही तयार करण्यासाठी, प्रथम आपण काकडी आणि मध घ्यावे. काकडी सोलून काकडीची प्युरी बनवावी. त्यानंतर काकडीच्या रसात मध मिक्स करावे. हे मिश्रण एका बाटलीत भरून चांगले मिक्स करुन घ्यावे. कॉटनच्या मदतीने हे फेशियल टोनर संपूर्ण चेहरा तसेच मानेवर लावावे.

मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उत्कृष्ट एक्सफोलिएटर बनवतात. हे तुमच्या त्वचेचे छिद्र खोलवर साफ करण्यास मदत करते आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्यांना प्रतिबंधित करते.

एका भांड्यात मध आणि पिठीसाखर टाकून नीट मिसळा.
आपला चेहरा ओला करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
हळुवारपणे आपला चेहरा आणि मान मालिश करा.
5-10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा.

(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)