
आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे टाॅयलेट. कुणीही पाहुणे घरी आल्यानंतर, त्यांना टाॅयलेटला जावं लागतंच. अशावेळी आपले टाॅयलेट सुवासिक आणि सुगंधी ठेवण्यासाठी काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे.
अनेकदा आपण घराची स्वच्छता उत्तम करतो, परंतु बाथरुम मात्र नीट स्वच्छ ठेवत नाही. किचनमधील काही ठराविक वस्तूंच्या वापरामुळे आपण आपले टाॅयलेट स्वच्छ ठेवू शकतो. यामध्ये कुठलाही जास्तीचा खर्चही नाही. शिवाय आपल्या टाॅयलेटमध्ये सुंगधही दरवळेल.
आपण ज्या वस्तू किचनवेस्ट म्हणून फेकून देतो, त्याच खूप गरजेच्या आहेत. टाॅयलेट फ्रेशनर बनवण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी गरजेच्या आहेत.
टाॅयलेट फ्रेशनर बनवण्याची पद्धत
लिंबाची साल
दालचिनी पावडर
लवंग
लिंबाची साल व्यवस्थित उन्हात सुकवून, ती मिक्सरमधून काढावी. त्यानंतर यामध्ये दालचिनी पावडर आणि लवंग सर्व एकत्र घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून काढावे. हे मिश्रण एखाद्या छोट्या डब्यात किंवा वाटीमध्ये टाॅयलेटमध्ये हे मिश्रण ठेवून द्यावे.
यामुळे बाथरुममध्ये चांगला सुगंध दरवळेल.
टाॅयलेटमध्ये फ्रेशनर ठेवण्याचे फायदे
टाॅयलेटमध्ये फ्रेशनर ठेवल्यामुळे, रिलॅक्स आणि स्ट्रेस फ्री झाल्यासारखे वाटते.
टाॅयलेटमध्ये होणारे छोटे छोटे किटक येण्यास मज्जाव होतो.
बाथरुममध्ये लिंबू तसेच दालचिनीच्या वापराने, मन प्रसन्न राहण्यास मदत होते.