
आपला मोबाईल हरवला, खराब झाला किंवा चुकून मोबाईलमधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झाले तर भलतंच टेन्शन येतं. अशा वेळी कॉन्टॅक्ट रिकव्हर करण्यासाठी काय करता येईल? ते जाणून घेऊ या.
1 तुमचं जीमेल अकाऊंट ओपन करा. यानंतर जीमेलच्या डाव्या बाजूला लिहिलेल्या ‘जीमेल’वर क्लिक करून ‘कॉन्टॅक्ट’ला क्लिक करा.
2 लगेचच तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व कॉन्टॅक्ट दिसतील. इथून हे सर्व कॉन्टॅक्ट तुम्ही सहजच कॉपी करू शकता.
3 जर तुमच्या फोनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट दिसत नसतील तर सेटिंगमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट बॅकअप ऑन करा.
4 याशिवाय सेटिंगमध्ये ‘अकाऊंट अँड सिंक’ला सिलेक्ट करा. ‘अॅड अकाऊंटला’ला क्लिक करा आणि तिथं जीमेल अकाऊंटला अॅक्टिव्हेट करा.
5 यामुळे तुम्हाच्या मोबाईलमध्ये जितके कॉन्टॅक्ट असतील ते आपोआप बॅकअप होत राहतील.