रशियाने युक्रेनवर डागले 100 ड्रोन्स

रशियाने युक्रेनमध्ये रात्रभर हल्ले चढवले. अनेक शहरांवर आणि नागरी वस्त्यांवर 100 हून अधिक ड्रोन्स डागले. हल्ल्यात 10 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले. यात तीन मुलांचा समावेश आहे, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हवाई हल्ले करण्यात आले. गेल्या आठवडाभरात रशियाकडून तब्बल 1 हजार 270 ड्रोन्स आणि 39 क्षेपणास्त्रे तसेच 1 हजारांहून अधिक शक्तिशाली बॉम्ब डागले. यात युक्रेनमधील अनेक शहरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले, मोठय़ा संख्येने नागरिकही मारले गेले, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली.