
बऱ्याचदा आपण वापरत असलेला स्मार्टफोन अचानक गरम व्हायला लागतो. हा फोन कशामुळे गरम होतो हे अनेकांना कळत नाही. परंतु चिंता करण्याची गरज नाही.
कोणत्याही कंपनीचा फोन गरम होत असेल तर सर्वात आधी फोनचे नेटवर्क आणि डेटाचा वापर बंद करा. यामुळे फोन थंड होण्यास मदत मिळू शकते.
फोनमधील बॅकग्राऊंडला सुरू असलेले अनावश्यक अॅप्स तत्काळ बंद करा. हे अॅप्स प्रोसेसरवर दबाव टाकत असतात. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो.
फोनला उन्हात किंवा गरम जागेपासून थंड जागेवर घेऊन जा. एसीमध्ये नेले तर उत्तम. जर फोन चार्जिंग होताना गरम होत असेल तर चार्जिंग काढून टाका.
फोनला रिस्टार्ट केल्याससुद्धा फोन थंड होऊ शकतो. फोनमधील सॉफ्टवेअर अपडेट करा. फोनमधील काही बग्समुळेसुद्धा फोन गरम होऊ शकतो.