शीवमध्ये शिवसेना गटप्रमुख, पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात

शीव विभाग क्र.-9 विधानसभा क्षेत्रातील शिवसेना गटप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा सरदारनगर समाजमंदिर हॉल येथे मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि महिला विभाग संघटक पद्मा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मुंबईसाठी एकत्र येऊया, विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली. यासाठी मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत जागरूक राहून काम करा, असेही ते म्हणाले. या मेळाव्यात आमदार मनोज जामसुतकर, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील मार्गदर्शन केले. या मेळाव्याप्रसंगी शीव कोळीवाडा विधानसभेचे विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, महिला विधानसभा प्रमुख प्रणीता वाघधरे, निरीक्षक शिवाजी गावडे, विनायक तांडेल, विधानसभा संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, महिला विधानसभा संघटिका प्रीतम निंबाळकर, उपविभाग प्रमुख राजेश कुचिक, दत्ता भोसले, एकनाथ पवार, प्रभाकर भोगले, माजी नगरसेवक रामदास कांबळे, स्मिता गावकर यांच्यासह शिवसैनिक-पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.