जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी दाढी रंगवतो, समजा वेळ आली – विराट कोहली

कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच विराट कोहलीने आपल्या निवृत्तीचा सस्पेन्स उघड केला. जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी दाढीचे पांढरे केस रंगवता तेव्हा समजा तुमची वेळ आलीय, अशा मिश्कील अंदाजात कोहली पत्रकारांना सामोरा गेला. निमित्त होते युवराज सिंग आयोजित फंडरेजर उपक्रमाचे.

मंगळवारी विम्बल्डनच्या टेनिस लढतींचा आस्वाद लुटल्यानंतर विराट कोहली युवराज सिंगच्या युवीफॅन कॅन्सर फंडरेजर या कार्यक्रमात सहभागी झाला. तेथे हिंदुस्थानचा पूर्ण संघही होता. तेव्हा हिंदुस्थानचा नव्या दमाचा संघ पाहून कार्यक्रमाचा निवेदक म्हणाला, विराट तुझी अनुपस्थिती जाणवतेय.

मुल्डर घाबरला आणि मोठी चूक केली! वैयक्तिक 367 धावांवर डाव घोषित केल्याबद्दल ख्रिस गेल नाराज

तेव्हा विराट थांबून म्हणाला, मी दोन दिवसांपूर्वीच माझी दाढी रंगवलीय. जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी दाढी रंगवता तेव्हा तुमची विश्रांती घेण्याची वेळ आल्याचे संकेत असतात. या कार्यक्रमात गिलसह पूर्ण संघ होता, पण साऱया नजरा विराट कोहलीच्या अवतीभवतीच फिरत होत्या.