मुंबई पोलिसांनी 634 मोबाईल आणि 58 तोळे सोने मालकांना केले परत

चोरीला गेलेले मोबाईल पह्न आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत मिळवून देण्याची यशस्वी कामगिरी मुंबई  पोलिसांनी केली आहे. तब्बल 634 मोबाईल पह्न तसेच विविध गुह्यांमधील 58.5 तोळे सोने, किया पॅरेन आणि मारुती इको ही वाहने असा एक कोटी 73 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो संबंधितांना परत करण्यात आला आहे.

परिमंडळ-5 अंतर्गत येणाऱया पोलीस ठाण्यांमध्ये  मोबाईल, सोन्याचे दागिने व वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा मुद्देमाल शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत जम्मू-कश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, आसाम, गुजरात, झारखंड, ओडिशा, तामीळनाडू, दिल्ली तसेच दुबई येथून एक कोटी तीन लाख 35 हजार रुपये किमतीचे 634 मोबाईल पह्न जप्त करण्यात आले. हे सर्व मोबाईल अनब्लॉक करून त्यांच्या मूळ मालकांना  परत करण्यात आले.

मोबाईलव्यतिरिक्त पोलिसांनी विविध गुह्यांमधील चोरीस गेलेले 58.5 तोळे सोने (दादर – 9.5 तोळे, शिवाजी पार्क – 5 तोळे, माहीम – 26 तोळे, कुर्ला – 18 तोळे) असे 46 लाख 80 हजार रुपये किमतीचे हे सोने आहे. तसेच दादर आणि माहीम पोलीस ठाण्यांतर्गत चोरीस गेलेली किया पॅरेन आणि मारुती इको ही चारचाकी वाहनेदेखील जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आली आहेत.