
जिरे आणि ओवा हे आपण आपल्या स्वयंपाक घरात वापरले जातात. परंतु हे दोन्ही मसाले अन्नाची चव वाढवतात. याशिवाय हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले जातात. ओवा पोटदुखी, अपचन यासारख्या समस्यांपासून आपल्याला आराम देते. तसेच जिरे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. जिरे आणि ओव्याचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणूनच रिकाम्या पोटी जिरे आणि ओवा यांचे पाणी पिण्याचे प्रमाण हे वाढू लागलेले आहे.
वजन कमी करायचे असल्यास, दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओव्याचे पाणी नक्की प्यायला हवे. जिरे आणि ओव्याचे पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होते. हे पाणी पिऊन पोटाची चरबी जळते. सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओव्याचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाणी प्यायला हवे.
जिरे आणि ओव्याचे पाणी पिण्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. हे पाणी पिण्यामुळे, शरीरातील घाण सहज निघून जाण्यास मदत होते. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने त्वचेची चमक वाढते. या पाण्यामुळे डाग आणि मुरुमांच्या समस्येपासून देखील आराम मिळतो. म्हणून त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी हे पाणी आहारात समाविष्ट करायलाच हवे.
Weight Loss Tips – वजन कमी करण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा
बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर, दररोज सकाळी जिरे आणि ओव्याचे पाणी प्यायला हवे. या पाण्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तसेच पोटदेखील सहज साफ होते. जिरे आणि ओव्याचे पाणी पिण्यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.
जिरे आणि ओव्याचे पाणी पिल्याने, यकृताचे आरोग्य देखील सुधारते. हे पाणी पिल्याने यकृताचे डिटॉक्स होण्यास मदत होते. जिरे आणि ओव्याचे पाणी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते. यामुळे आपल्या शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
जिरे आणि ओव्याचे पाणी कसे बनवायचे?
यासाठी 2 ग्लास पाणी घ्या. त्यात 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घाला. हे पाणी चांगले उकळवून घ्यावे. अर्धे पाणी शिल्लक राहते तेव्हा हे पाणी गाळून प्या. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि ओव्याचे पाणी पिऊ शकता.