ट्रेंड – देशी जुगाड

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ते खोटे नाही. आपल्या देशात विशेषतः गावखेडय़ात लोक रोजच्या जगण्यातील अडचणींवर उपाय शोधताना जे काही देशी जुगाड करतात त्याला तोड नाही. झारखंडमधील खुंती येथील असाच एक जुगाड सध्या सोशल मीडियात ट्रेंड करतो आहे. खुंती येथील एक ओढय़ावरील पूल ऐन पावसाळय़ात कोसळला आहे. हा पूल हजारो लोकांचा आधार होता. शाळकरी मुलंही त्यात होती. पण पूल कोसळल्याने शाळेत जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. सरकार याकडे कधी लक्ष देईल आणि तो पूल कधी नव्याने तयार होईल याची शाश्वती नसल्यामुळे लोकांनीच मग एक जुगाड केला. तुटलेल्या पुलाला शिडी लावून त्यावर मार्ग शोधून काढला. आता शाळकरी मुलं व इतर गावकरी शिंडीने अर्ध्या तुटलेल्या पुलावर चढून पुढची वाट चालत आहेत. याचे एकीकडे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सरकारी अनास्थेवर टीकेची झोड उठली आहे.