असं झालं तर… ट्रेन सुटली, तिकिटाचे काय?

अनेकदा प्रवाशांना लेट होतो आणि त्यांची ट्रेन सुटते. मग आपले तिकीट फुकट गेले असे प्रवाशांना वाटते. पण हे तिकीट अजून काही गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते.

जनरल (अनारक्षित) तिकीट असेल तर चिंता करू नका. जनरल डब्यात जागा रिकामी असेल तर तुम्ही तेच तिकीट वापरून दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता.

जर तुमचे तिकीट कन्फर्म आरक्षण असलेले असेल तर त्या तिकिटावर दुसऱया ट्रेनने प्रवास करता येत नाही. तुम्ही दुसऱया ट्रेनमध्ये बसलात तरी टीटीई दंड आकारू शकतो.

जर तुम्ही प्रवास करू शकला नाही, तर तुम्ही रिफंडसाठी टीडीआरसाठी (तिकीट डिपॉझिट रिसीट) ऑनलाईन आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता.

काऊंटर तिकीट असल्यास स्टेशनवर जाऊन फॉर्म भरा. आवश्यक माहिती भरा. टीडीआर ट्रेन सुटल्याच्या एक तासाच्या आत फाईल करणे गरजेचे आहे.