कामांचा हिशेब मागितला म्हणून वीज-पाणी कापले, भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याची मुजोरी

रस्तोरस्ती पडलेले खड्डे, वीज नाही… अशा अनेक समस्यांचा पाढा वाचून आणि प्रश्नांची सरबत्ती करत गावकऱ्यांनी भाजप मंत्री जोराराम कुमावत यांच्याकडे 17 महिन्यांतील विकासकामांचा हिशेब मागितला. त्यामुळे संतापलेल्या कुमावत यांनी गावात अधिकारी पाठवून वीज आणि पाणी कापल्याचे समोर आले आहे.

राजस्थानच्या गुरलाई आणि पाली येथे ही घटना घडली असून यावरून भाजपशासित राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची मुजोरी सुरू असल्याचे आणि जनतेचा आवाज दाबण्यात येत असल्याचेच समोर आले आहे.

अधिकारी गावात पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी मोबाईलद्वारे व्हिडीओच काढला आणि अधिकाऱ्यांनाही जाब विचारला. परंतु, अधिकाऱ्यांनी या गावकऱ्यांना उडवून लावले. याचा व्हिडीओ काँगेसने एक्सवरून शेअर केला आहे.