
मिंधे गटाचे आमदार व राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे खरोखरच पैशांच्या बॅगा असल्याची कबुली त्यांनी एका वक्तव्यातून दिली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना, ‘पैशांसाठी काही अडले, असे समजण्याचे काहीच कारण नाही. पैसे देणारे आम्हीच आहोत. आजकल हमारा नाम चल रहा है. त्यामुळे पैशांची चिंता करू नका. एखादी बॅगच पाठवतो तुमच्याकडे,’ असे आश्वासन शिरसाट यांनी संस्थेच्या अधिष्ठात्यांना दिले. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमुळे वादात फसलेले शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.