
इगतपुरीत हॉटेल कॅमल व्हॅली येथे मनसेचे तीन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर आजपासून सुरू झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिबीरस्थळी दाखल झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिबिराला अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अभिजित पानसे, दिनकर पाटील हे उपस्थित आहेत.