
थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस डॉक्टोरल मॉनिटरिंग बोर्ड आणि इंडो युरोपियन समिट अॅण्ड अवॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत आयोजित एका भव्य समारंभात जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांना सामाजिक कार्य व जनसंपर्क क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी गेली 35 वर्षे जुन्नर तालुकाच नव्हे तर उत्तर पुणे जिह्यात शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात काम करून एक वेगळाच पायंडा घालून दिला आहे. या समारंभास प्रसिद्ध उद्योजक व वृत्तपत्र वितरक बाजीराव दांगट, मंदाकिनी दांगट, नीलेश दांगट, विजयश्री दांगट आणि ईश्वरी दांगट उपस्थित होत्या.