
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे दाद देत नसल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. पुतीन यांच्यावर तोफ डागत ट्रम्प यांनी युक्रेनला लष्करी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला अत्याधुनिक कॅट्रियट एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम देण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.
ट्रम्प यांचे विशेष दूत जनरल कीथ यांनी सोमवारी कीवला जाऊन युक्रेनी अधिकाऱयांची भेट घेतली. या भेटीत संरक्षण, शस्त्रास्त्र पुरवठा व अन्य सहकार्याविषयी चर्चा झाली. पेट्रियॉट मिसाइल सिस्टम ही अमेरिकेची सर्वात आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणा आहे. शत्रूराष्ट्रांकडून होणाऱया ड्रोन, क्रूझ, मिसाइल व इतर हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यास ही यंत्रणा सक्षम आहे.
पुतीन दिवसा गोड बोलतात, रात्री बॉम्ब टाकतात!
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात पुतीन हे अडथळा असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ‘पुतीन हे वेडे आणि सणकी आहेत. ते दिवसा गोड-गोड बोलतात आणि रात्री युक्रेनवर बॉम्ब टाकतात, असा त्रागा ट्रम्प यांनी व्यक्त केला.