वडाळ्यातील दोन चिमुकल्यांवर विकृताचा लैंगिक अत्याचार, रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

वडाळ्यातील दोन चिमुकल्यांवर कल्याणमधील विकृताने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अरुण उत्तप्पा (२८) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन्ही (11) वर्षीय मुलांवर लैंगिक अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे या विकृताने मुलांना लिपस्टीक लावून जेलचा वापर करत अत्याचार करत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असलेल्या पोलिसांना त्याच्यावर संशय येताच त्यांनी अरुणसह दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

कल्याण रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांनी एक व्यक्ती संशयास्पद फिरताना दिसून आली. त्याच्यासोबत असलेली दोन अल्पवयीन मुले ही भयभीत असल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि पथकाने त्या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची चौकशी केली असता पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी पीडित चिमुकल्यांना विचारणा केली असता त्यांनी टाहोच फोडला. अरुण हा दोन्ही मुलांना लिपस्टीक लावून जेलचा वापर करून अत्याचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा जाच सुरू असून आज फिरायला नेतो असे सांगून तो कल्याणमध्ये घेऊन आल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी अरुणच्या मुसक्या आवळत दोन्ही मुलांची सुटका केली. अरुणची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून लिपस्टिक व जेल सापडले