कोथिंबीर खराब होत असेल तर हे करून पहा…

कोथिंबीर खराब होत असेल तर ती जास्त दिवस ताजीतवानी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करा. कोथिंबीरचे देठ कापून ती पाण्याच्या ग्लासमध्ये ठेवा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकून ठेवा. यामुळे ती दोन आठवड्यांपर्यंत ताजीतवानी राहील.

कोथिंबीर धुऊन व वाळवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एयरटाइट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. कोथिंबीरला पॉलीथिनमध्ये गुंडाळून ती हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. अशा पद्धतीने काही उपाय केल्यास कोथिंबीर जास्त दिवस हिरवीगार राहते.