सोने तस्करीप्रकरणी रान्या रावला एक वर्षाचा कारावास

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याची तस्कीर केल्याप्रकरणी एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रान्या राव हिच्यासह अन्य दोन जणांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने या तिन्ही आरोपींना शिक्षेवेळी जामीन मिळणार नसल्याचे सांगितले. रान्या राव हिला बंगळुरू विमानतळावर 14.8 किलो सोन्याची तस्करी करताना पकडले होते. ती दुबईवरून आली होती. या अटकेनंतर ईडीने मनी लॉण्डरिंग गुह्यांतर्गत रान्या राव हिची 34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती.