Hair Loss Tips – केसगळती रोखण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करायलाच हवेत, वाचा

पावसात भिजल्यामुळे केसगळती ही मोठ्या प्रमाणात होते. शिवाय तुम्ही केस बांधत असाल तर, केसात आलेल्या घामामुळे, केसगळती फार मोठ्या प्रमाणात होते. केसगळतीमुळे अनेकदा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणूनच केसगळतीवर उपाय करणे हे खूपच गरजेचं आहे. केसगळतीवर अनेक घरगुती उपाय आहेत. फक्त ते उपाय करण्यामध्ये सातत्य असायला हवं.

केसगळतीमुळे केसांचं सौंदर्य पूर्णपणे बिघडतं. त्यामुळे अनेकदा समोरच्या भागाला टक्कल पडण्यास सुरुवात होते. म्हणूनच केसगळती रोखण्यासाठी कुठल्याही केमिकल्सचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपायांनी केसगळती कमी करणं गरजेचं आहे.

Hair Care – केसांना मुलतानी माती लावण्याचे काय होतात फायदे? वाचा

केसगळतीवर साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केळी आणि मध हे एक उत्तम कॅम्बिनेशन आहे. कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. केस मऊसुत होण्यास मदत होते.

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस 20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा. हा रस लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडेसे दही मिसळा आणि केसांच्या मूळाशी लावावे. केसांना चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम पर्याय आहे.