
या आठवडय़ात एक-दोन नव्हे तर तब्बल 11 आयपीओ येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी आहे. यामध्ये 6 एमएसई आणि 5 मेनबोर्ड आयपीओ आहेत. एमएसई आयपीओमध्ये सॅवी इन्फ्रा अँड लॉजिस्टिक, स्वस्तिक वैसल, मोनार्क सर्वेयर्स अँड इंजिनीयरिंग कन्सलटंट, टीएससी इंडिया, पटेल केम स्पेशियालिटीज, सेलारॅप इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे. मेनबोर्ड आयपीओमध्ये प्रॉपर्टी शेअर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स, इंडिक्यूब स्पेसेज, ब्रिगेड हॉटेल व शांती गोल्ड इंटरनॅशनल यांचा समावेश आहे.