
दिल्लीतील बंगल्यात पोती भरून जळालेल्या नोटा सापडल्यानंतर वादात सापडलेल्या न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव आज राज्यसभेत स्वीकारण्यात आला नसल्याचे वृत्त आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव सादर करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, वर्मा यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे समिती नेमणार असून पुरेशी कारणे समोर आली की लोकसभेत महाभियोग प्रस्ताव सादर केला जाणार आहे.



























































