
शिवसेना (उद्धव बाळासाहेबव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छांचे ट्विट केले आहे.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/sFp2Hduubx— Raj Thackeray (@RajThackeray) July 27, 2025
”माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या”, असे राज ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.