
अन्नपदार्थ खराब होऊन वाया जाऊ नयेत यासाठी अनेक गृहिणी प्रयत्न करत असतात. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता असल्याने पदार्थात बॅक्टेरिया वाढण्यासाठी हे पोषक वातावरण असते. याकाळात अन्नपदार्थ बऱ्याचदा लवकर खराब होतात. तेव्हा पावसाळ्यात घरात साठवलेले अन्नपदार्थ खराब होऊ नयेत यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
पावसाळ्यात अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या डब्यांचा वापर करू शकता. फरसाण, ड्रायफ्रुटस् ठेवण्यासाठी काचेच्या बरण्या वापरा. ताजी भाजी आणि फळे खरेदी करा. पावसाळ्यात नियमितपणे फ्रीजची सफाई करा. फ्रीज साफ नसेल तर पदार्थ लवकर खराब होतात. तसेच जेवण नेहमी झाकून ठेवा.