आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित अधिकारी व अभियंत्यांशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर रहिवाशांना घरांचा ताबा द्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.