
- सर्वात आधी हात स्वच्छ धुवा. चष्मा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाणी लेन्सला नुकसान पोहोचवू शकते. चष्मा पुसण्यासाठी स्वच्छ आणि कोरडय़ा कपडय़ाचा वापर करा.
- चष्मा स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा मॉइश्चरायरझर नसलेला सौम्य साबण वापरू शकता. कडक साबण किंवा डिटर्जेंटने लेन्स खराब होण्याची भीती आहे. अल्कोहोल, ऑसिटोन किंवा अमोनिया क्लिनरचा वापर टाळा. ज्या वेळी चष्मा वापरत नसाल, त्या वेळी चष्म्याला व्यवस्थित ठेवा. चष्म्यावर धूळ बसणार नाही, त्याला व्रॅच पडणार नाहीत, याची काळजी घ्या.