प्रांजल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा

पुण्यातील कथित रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, लोणीकंद येथील हॉटेलमधील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, ज्यामध्ये ड्रग्जचा वापर आणि बेकायदा कृत्ये आढळली. प्रांजल यांच्यावर ड्रग्ज पुरवठ्याचा आणि सेवनाचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून, 40 हून अधिक जणांची चौकशी सुरू आहे.