IND vs ENG 5th Test – बॅझबॉलचा धमाका! इंग्लंडची वादळी सुरुवात, क्रॉली-डकेटची तुफान फटकेबाजी

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटीमध्ये इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाची वादळी सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 224 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने चौफेर फटकेबाजी करत 12 षटकांमध्ये 92 धावा चोपून काढल्या आहेत. झॅक क्रॉलीने 39 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा केल्या असून 11 चौकार ठोकले. आहेत तर बेन डकेटने 33 चेंडूंमध्ये नाबाद 43 धावा केल्या असून 5 चौकार आणि 2 षटाकार मारले आहेत.